व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -शहर परिसरात अनेक छोट्या मोठ्या कंपन्या आहेत. त्यांना मनुष्यबळ पुरवण्यासाठी व शहरातील युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने मोरवाडीत औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू केली आहे. त्या माध्यमातून आयोजित रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रातील नामवंत कंपन्या सहभागी होणार आहेत.
महापालिकेच्या मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शुक्रवारी (ता. १६) सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत रोजगार मेळावा आयोजित केला आहे.
दहावी, बारावी, आयटीआय, विविध विद्याशाखांमधील पदवीधर इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहून रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मोरवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शशिकांत पाटील यांनी केले आहे.
Discussion about this post