व्हीएसआरएस मराठी न्युज आकुर्डी –हवामानातील बदलामुळे साथीच्या आजारात वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे डेंगी, मलेरिया व काविळीचे रुग्ण आढळत आहेत. जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत ६ हजार ६४२ डेंगीसदृश्य आढळून आले आहेत. दुसरीकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील भरलेले कोंडाळे, साचलेल्या गटारी स्वच्छ केला जात नसल्यामुळे प्रादुर्भाव वाढत आहे.
लालबहादूर शास्त्री नगर क्रांतीनगर येथील नाल्याचं काम साफसफाईच सुरू केले आहे अनेक दिवसापासून नागरिकांची तक्रार होती दुर्गंधीमुळे नागरिक हैरान होते मनसे शहर संघटक केके कांबळे योगिता कांबळे आदी कार्यकर्ता यांच्या मागणी केले नंतर साफ सफाई चालु करण्यात आली.
शहरात स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सक्त सूचना केल्या आहेत. डेंगी होण्यास कारणीभूत असणाऱ्या डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात औषध फवारणीची केली जाते. मलेरिया, कावीळ, गॅस्ट्रो यासारख्या आजाराचे रुग्ण आढळल्याच्या नोंदी नाहीत. स्वच्छतेला प्राधान्य देताना खबरदारी म्हणून गॅरेज, सोसायटींची स्वच्छता केली जाते. ”
– डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी महापालिका
Discussion about this post