व्हीएसआरएस मराठी न्युज -महापौर मैदानावर बिना परवाना खाजगी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून .
त्या ठिकाणी १५ हजार स्केअर फुट बिना परवाना मंडप उभारण्यात आला असून त्यामुळे लाखो रुपये मंडप परवाना रक्कम पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी बुडवून आथिर्क नुकसान होत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन सदर खाजगी धार्मिक कार्यक्रम आयोजक ह्यांच्या विरोधात बिना परवाना मंडप उभारण्यात आला म्हणून कारवाई करुन सदर महापौर मैदानं भाडे वसूल करण्यात यावे १००० हजार स्केअर फुट रक्कम अ क्षेत्रिय कार्यालय ह्या ठिकाणी खाजगी कार्यक्रम आयोजक ह्यांनी जमा केली असून त्या ठिकाणी १५ हजार स्केअर फुट बिना परवाना मंडप उभारण्यात आला असून त्या संदर्भात अ क्षेत्रिय कार्यालय ह्यांनी कोणत्याही प्रकारची मंडप परवानगी देण्यात आली नाही .
तसेच मंडप रक्कम जमा करण्यात आली नाही सदर कार्यक्रम दोन महिने महापौर मैदानं ह्या ठिकाणी होणार असून महापौर मैदानं शेजारी शाळा व कॉलेज असून त्या ठिकाणी पार्किंग सुविधा उपलब्ध नाही तरीही खाजगी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत ह्या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन व अ क्षेत्रिय अधिकारी ह्यांनी ताबडतोब दखल घेऊन कारवाई केली नाही तर दिनांक १६/११/२०२२ रोजी अ क्षेत्रिय कार्यालय समोर लाक्षणिक उपोषण व मुडन आंदोलन करण्यात येणार आहे.
अशी निवेदन सचिन काळभोर सामाजिक कार्यकर्ते
Discussion about this post