व्हीएसआरएस मराठी न्युज –डॅशिंग आयएएस अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. आज, मंगळवारी राज्यातील ६ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
तुकाराम मुंढे हे २००५ सालच्या आयएसएस बॅचचे अधिकारी आहेत. गेल्या १६ वर्षांच्या सेवेत तुकाराम मुंढेंची २० पेक्षा जास्त वेळा बदली करण्यात आली. तुकाराम मुंढे हे आपल्या आक्रमक कार्यशैलीमुळे ओळखले जातात. यापूर्वी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी त्यांना आरोग्य आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली होती. आरोग्य भवन येथील कार्यालयात डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडून त्यांनी पदभार स्विकारला होता.
Discussion about this post