व्हीएसआरएस मराठी न्युज –महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची रक्कम दहा लाखांवरून २५ लाख रुपये करण्याचा निर्णय मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
बैठकीत पुरस्काराच्या स्वरूपाबाबत तपशीलवार चर्चा झाली. पुरस्कारासाठी सुमारे २७ नावांचे प्रस्ताव सरकारकडे आले होते, त्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. बैठकीत काही सदस्यांनी नवीन नावेही सुचविली. त्यांचाही नव्याने विचार करण्याचे ठरले.
महाराष्ट्रात अनेक कर्तबगार व्यक्तिमत्त्व आहेत. अनेकांनी विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अशा अनेक व्यक्तिमत्त्वांचा या पुरस्कारासाठी विचार व्हावा. याकरिता सर्वंकष अशी नियमावली करण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.
Discussion about this post