व्हीएसआरएस मराठी न्युज –कोरोनाची रुग्णांची संख्या पुन्हा वाढते आहे. H3N2 virus कोविड-19 सोबतच भारतात H3N2 आहे, इन्फ्लूएंझा ए व्हायरसची प्रकरणेही सातत्याने समोर येत आहेत.
म्हणजेच भारतात कोरोना आणि H3N2 या दोन्ही प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने लोकांच्या चिंता वाढल्या आहेत. महाराष्ट्रात एकाच दिवसात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली असून दोन जणांचा मृत्यूही झाला आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे H3N2 चे वाढते रुग्ण यामुळे आरोग्य विभागाने योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.
H3N2 इन्फ्लूएंझा विषाणू संक्रमित H3N2 virus व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीमध्ये खोकला किंवा शिंकाद्वारे प्रसारित होतो. H3N2 विषाणू संसर्गाची सामान्य लक्षणे फ्लूसारखी असतात. या विषाणूच्या पकडीत ताप किंवा तीव्र सर्दी, खोकला, घसा खवखवणे, नाक वाहणे किंवा काही बाबतीत नाक बंद होणे, डोकेदुखी आणि थकवा जाणवतो. काही प्रकरणांमध्ये, उलट्या किंवा अतिसार देखील होऊ शकतो. श्वास घेण्यास त्रास होणे हे देखील या विषाणूचे लक्षण असू शकते जे तीन आठवडे टिकून राहते.
कोणत्याही विषाणूंप्रमाणेच H3N2 विषाणूपासून H3N2 virus बचाव करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्या, मास्क घाला, हात धुवा आणि संसर्ग टाळण्यासाठी वारंवार चेहऱ्याला स्पर्श करणे टाळा. लोकांनी मास्क घालणे आणि ते गांभीर्याने घेणे बंद केले आहे, परंतु फेस मास्क फ्लूचा प्रसार थांबवू शकतो आणि हानिकारक कण शरीरात जाण्यापासून रोखू शकतो, म्हणून मास्क घाला. “H3N2 इन्फ्लूएंझा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या खोकल्याद्वारे किंवा शिंकाद्वारे निरोगी व्यक्तीपर्यंत पोहोचत आहे. संसर्ग टाळण्यासाठी संरक्षण घेणे आवश्यक आहे. यासाठी गर्दीच्या ठिकाणी टाळा. सार्वजनिक ठिकाणी असताना मास्क घाला. वारंवार हात धुवा. साबण ज्यांना फ्लू आहे किंवा ज्यांना फ्लूची लक्षणे आहेत त्यांच्याशी संपर्क टाळा. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की गर्दीमुळे संसर्गाचा धोका जास्त असू शकतो. कोविड-19 एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये फक्त खोकणे, शिंकणे, बोलणे यामुळे पसरू शकते, त्यामुळे योग्य अंतर ठेवा. कोणाला काही लक्षणे दिसल्यास ताबडतोब काळजी घ्यावी. खोकला, सर्दी, ताप, छातीत दुखणे, श्रवण कमी होणे आणि वास येणे ही कोविड-19 ची लक्षणे आहेत. कोविड-१९ टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावा. वेळोवेळी हात धुत रहा.
राज्यात H3N2 च्या संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पाहिला बळी गेल्याची धक्कादायक माहिती .
महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याची बैठक नियोजित केली असून, संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना आणि प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. वास्तविक, मुंबईत राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यानिमित्त आमदार लांडगे मुंबईत आहेत. शहरातील विविध प्रश्नांसदर्भात पाठपुरावा सुरू आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये H3N2 चा पहिला बळी गेला आहे. ७३ वर्षीय वृद्धाचा H3N2 ने बाधित होऊन मृत्यू झाला. हे वृत्त समजल्यानंतर आमदार लांडगे तातडीने शहरात येण्यासाठी रवाना झाले आहेत. महापालिका आरोग्य, वैद्यकीय विभाग आणि रुग्णालय प्रमुखांसह संबंधित अधिकारी आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. यामध्ये शहरातील H3N2 चा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येणार आहेत.
नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन…
गेल्या काही दिवसांपासून एका वृद्ध व्यक्तीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. संबंधित रुग्णाला सर्दी, खोकल्याची लक्षणं असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. पिंपरी-चिंचवड ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या शून्य रुग्ण आहे अशी माहिती वैद्यकीय विभागाने दिली आहे. मात्र, तरीही नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.
Discussion about this post