Breaking News : पिंपरी : आकुर्डीतील पांढरकरवस्ती चौकातील पंचतारानगर येथे एका व्यक्तीच्या घरात घुसून त्याच्यावर दोघांनी धारदार शस्त्राने वार करत प्राणघातक हल्ला केला. ही घटना ७ डिसेंबर रोजी रात्री सव्वादहा वाजता घडली. हला झालेल्या व्यक्तीची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर बिर्ला रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
मिठाईलाल बरूड (वय ४०) असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर शिवम दुबे उर्फ दुब्या आणि अमन पुजारी या दोघांनी तलवारीसारख्या धारदार शस्त्राने वार केले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मिठाईलाल बरूड डिसेंबर 2023 रोजी रात्री आपल्या घरात झोपले होते. सव्वादाहाच्या सुमारास आरोपी त्यांच्या घरात घुसले. आणि, मिठाईलाल यांना मारहाण करून त्यांना ‘मी तुला सोडणार नाही, आज तुला मारून टाकीन’ अशी धमकी देत त्यांच्यावर तलवारीसारख्या धारदार शस्त्राने वार केले. पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध कलम 307,452,323,506,34 आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 4(25) आणि मुंबई पोलीस कायद्याच्या 37(1)(3)135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केकाण करीत आहेत.
Discussion about this post