Breaking News : पिंपरी : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एन. आय. ए.) आज दि. ९ डिसेंबर रोजी महाराष्ट्र आणि कर्नाटकात ४३ ठिकाणी छापे घातले. यावेळी १५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रात ४३ ठिकाणी छापे घालण्यात आले आहेत तर कर्नाटकात एका ठिकाणी एन.आय.ए.ने छापा घातला आहे.
महाराष्ट्रात पुण्यात एका ठिकाणी, ठाणे ग्रामीण परिसरात ३१ ठिकाणी, ठाणे शहर परिसरात एका ठिकाणी आणि भाईंदर येथे एका ठिकाणी छापे घालण्यात आले आहेत. या संपूर्ण कारवाईत १५ जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती एन. आय. ए. ने आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून दिली आहे.
एन. आय. ए. ने सध्या इसिस या दहशतवादी संघटनेची पाळेमुळे उखडण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील कोंढवा परिसरातही अशीच कारवाई करण्यात आली होती.पुण्यामध्ये बांगलादेशी घुसखोरांचे आणि दहशतवादी कारवाया करणा-यांचे प्रमाणही वाढले असल्याचे यावेळी उघड झाले होते.
Discussion about this post