Pune News : पुणे : मावळातील कोथुर्णे या गावी २ ऑगस्ट २०२२ रोजी एका ७ वर्षांच्या बालिकेचे अपहरण झाले होते. तिचा मृतदेह नजिकच्या झुडुपात आढळला होता. या प्रकरणी कामशेत पोलिसांनी वेगाने तपास करत २४ तासात आरोपीला अटक केली होती. हा खटला पुण्यातील शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयात सुरू होता. त्याचा निकाल आज २२ मार्च रोजी लागला असून आरोपीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर, त्याच्या आईला ७ वर्षांची शिक्षा न्यायालयाने दिली.
तेजस ऊर्फ दादा महिपती दळवी (रा. कोथुर्णे) असे फाशी झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने कोथुर्णे गावातील ७ वर्षांच्या बालिकेचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि नंतर तिची हत्या केली होती. कामशेत पोलीसांनी या प्रकरणाचा २४ तासात छडा लावून आरोपी तेजस याला अटक केली होती. या प्रकरणाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून आरोपीच्या आईलाही या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले होते.या प्रकरणी तिलाही न्यायालयाने दोषी मानले आणि ७ वर्षांची सजा सुनावली आहे.
Discussion about this post