व्हीएसआरएस न्युज पिंपरी- पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने खेड तालुक्यात 7 ऑक्टोबर रोजी 20 कोटी रुपयांचे 20 किलो मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज पकडले होते. आरोपींनी रांजणगाव येथील एका कंपनीत तब्बल 132 किलो आणि रायगड जिल्ह्यातील महाड येथे 10 ते 15 किलो एमडी ड्रग्ज तयार केल्याची माहिती सामोर आली आहे.
तपासाचा तिसऱ्या टप्प्यात पिंपरी चिंचवड पोलिसांनी ड्रग्स बनविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या स्वयंघोषित डॉक्टरसह सहा जणांना गुजरात आणि मुंबईमधून अटक केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी 20 जणांना अटक केली आहे. यात प्रशिक्षण, फॅक्टरी जागा, केमिकल उपलब्ध करून देणारा, विक्री करणारा यांचा समावेश आहे.
आतापर्यंत अटक केलेले आरोपी चेतन फक्कड दंडवते (वय 28, रा. मलठण-आंब्रेवस्ती, ता. शिरुर) आनंदगीर मधुगिर गोसावी (वय 25, रा. जि. जळगाव. सध्या रा. अकोले, शिरुर), अक्षय शिवाजी काळे (वय 25, रा. पाचणे मळा, ता. शिरुर), संजीवकुमार बन्सी राऊत (वय 44, रा.झारखंड, सध्या रा. उत्तरप्रदेश), तौसिफ हसन मोहम्मद तस्लीम (वय 31, रा. मुजफ्फरनगर. सध्या रा. नोएडा) अशी सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आता पोलिसांनी परशुराम भालचंद्र जोगल (वय 44, रा.ठाणे), मंदार बळीराम भोसले (वय 49, ठाणे), राम मनोहरलाल गुरबानी (वय 43, रा. वेस्ट मुंबई), अरविंदकुमार प्रकाशचंद लोहरे (वय 39, रा. ओशिवरा मुंबई. मुळगाव जटनगला पो स्टे बडकेली जि मुझफरनगर उत्तरप्रदेश), मनोज एकनाथ पालांडे (वय 40, रा. गणेशनगर वरसे ता रोहा जि रायगड), अफजल हुसैन अब्बास सुणसरा (वय 52, रा. जोगेश्वरी वेस्ट मुंबई. मुळगाव मेहता ता बडगाम जि बनासकाठा उत्तर गुजरात) यांना अटक केली आहे.
ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील, प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ, हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, प्रशांत महाले, सागर पानमंद, अंबरीश देशमुख, पोलीस सब इन्स्पेक्टर गिरीष चामले व पोलीस अंमलदार दत्तात्रय बनसुडे, मयुर वाडकर, स्वामिनाथ जाधव, सुनिल कानगुडे, सावन राठोड, निशांत काळे, अशिष बोबडे, शकुर तांबोळी, संदिप पाटिल, अतुल लोखंडे, नागेश माळी, विठठल सानप, शैलेश मगर, अशोक गारगोटे,प्रदिप गुडे यांच्या पथकाने केली आहे.