व्हीएसआरएस न्युज पिंपरी -धडक कारवाई पथकातील अधिकारी व कर्मचारी यांची कार्यशाळा आज ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे झाली,
या शहरातील नागरिकांची जगण्याची गुणवत्ता विकास कामांच्या माध्यमातून आपण ठरवू शकतो. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपली नैतिक जबाबदारी व भान ठेवून काम करावे. एकसंघपणे सर्वांनी काम करून येत्या वर्षात पिंपरी चिंचवड हे शहर देशांतील सर्वात सुंदर स्वच्छ व अतिक्रमण मुक्त शहर बनवण्याचा ध्यास सर्वांनी घ्यावा असेही आयुक्त राजेश पाटील म्हणाले.
प्रत्येक बीट निरीक्षकाने आपल्या बीटमध्ये अनधिकृत बांधकाम व रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी. पथारी व्यावसायिकांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करून त्यांचा रोजगार अबाधित राहील याची दक्षता घेण्याचे नियोजन करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, शहर अभियंता राजन पाटील, सहशहर अभियंता मकरंद निकम, श्रीकांत सवणे, सतीश इंगळे, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, यांच्यासह सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, सिताराम बहुरे, सोनम देशमुख, सुचेता पानसरे, विजयकुमार थोरात, रविकिरण घोडके, कार्यकारी अभियंता संजय भोसले, प्रशासन अधिकारी, अतिक्रमण निरीक्षक, परवाना निरिक्षक, बीट निरीक्षक आदी उपस्थित होते.
Discussion about this post