व्हीएसआरएस न्युज महाराष्ट्राचा मानबिंदू व समृद्ध वारसा असणाऱ्या “मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या” अध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली.
महाराष्ट्र व भारताचे अग्रणी नेते शरद पवार या एकतर्फी झालेल्या निवडणुकीत सहज निवडून आले. त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल.
उपाध्यक्ष पदाच्या सात जागांसाठी चौदा उमेदवार होते. तीही निवडणूक एकतर्फीच होवून सात दिग्गज उमेदवार निवडून आले.
निवडून आलेल्यात,सौ विद्या चव्हाण, माजी, भालचंद्र मुणगेकर,अरविंद सावंत,प्रदीप कर्णिक,प्रभाकर नारकर,कु.अमला नेवाळकर,श्री. शशी प्रभू, हेही विद्वजन निवडून आले.
तसेच 15 कार्यकारिणी सदस्यांची निवड बिनविरोध झाली. अशी माहिती निवडणूक अधिकारी किरण सोनवणे यांनी दिली.
Discussion about this post