पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये विविध विकास योजना राबविण्यात येणार असून, जायकामार्फत ४०० कोटींचे कर्ज किंवा कर्जरोखे काढून समाविष्ट गावांत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. सांडपाणी व्यवस्थापन, समान पाणीपुरवठा योजना, रस्ते यांसारख्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यात आली आहे. महापालिका हद्दीत ऑक्टोबर २०१७ मध्ये अकरा आणि त्यानंतर गेल्या वर्षी जून महिन्यात २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे.
समाविष्ट गावांमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता असल्याचा आरोप सातत्याने स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आगामी अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट गावांसाठी भरीव तरतूद करण्यात आली असून, आगामी वर्षभरात समाविष्ट गावांचा विकास आराखडा करण्याचेही निश्चित करण्यात आले आहे.
Discussion about this post