पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. व्हिक्टोरिया रोडवर ही घटना घडली. रामदास केशव पाटोळे (वय ६५, रा. भवानी पेठ) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कैलास पाटोळे (वय ५८) यांनी तक्रार दिली आहे.
रामदास पाटोळे यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तक्रारदार यांचे चुलते रामदास पाटोळे हे दुचाकीवरून व्हिक्टोरिया रोडने जात होते. त्यावेळी बंगला नंबर २७ समोर आल्यानंतर पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात खाली पडून ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला.
पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून चालकाचा शोध घेतला जात आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात विविध गुन्हे घडत आहेत. यामध्ये खून, बलात्कार, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यानंतर आता भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
Discussion about this post