व्हीएसआरएस मराठी न्युज –नाशिक जिल्ह्यातून एक धक्क्दायक बातमी समोर आली आहे. नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन झाले आहे. मानस पगार हे युवक काँग्रेसमधील चर्चेतला चेहरा म्हणून ओळखले जायचे.
काँग्रेसची भूमिका सोशल मीडियावर अत्यंत आक्रमकपणे मांडत. त्यामुळे पक्षानेही त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्यावर युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र, बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात त्यांनी आपले प्राण गमावले.
मानस पगार आणि त्यांच्यासोबत काही सहकारी नाशिक येथे जात असताना हा अपघात घडला. नाशिकमधील लोकमान्य रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र मानस यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. इतर लोकांवर उपचार सुरु आहेत.
Discussion about this post