व्हीएसआरएस मराठी न्युज -माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांवरील कारवाई मागे, शिवसेनेकडून अनावधानावं बातमी दिल्याची सारवासारवी.
पक्षविरोधी काम केल्याचा शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यावरुन माजी खासदार शिवाजीराम आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. दरम्यान, आढळराव पाटलांवरची कारवाई मागे घेण्यात आली असून हे शिवसेनेचे मुख्यपत्र असलेल्या सामनातून अनावधानानं बातमी दिल्याची माहिती देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यानं पाटील यांच्यावर त्याच्या समर्थकांवर कारवाईचं सत्र सुरू आहे.
यापूर्वी देखील शिवसेनेतून अनेकांची हकालपट्टी करण्यात आलीय. एकनाथ शिंदे गटासोबत सामील झाल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीय. त्यामुळे आढळराव पाटील यांच्यावरही तशीच कारवाई करण्यात आल्याचं सामनातून वृत्तानुसार बोललं जात होतं. दरम्यान, शिवसेनेकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावरील कारवाई शिवसेनेकडून मागे घेण्यात आली आहे.
Discussion about this post