व्हीएसआरएस मराठी न्युज -नवरात्र हा सण सप्टेंबर किंवा ऑक्टोबर या महिन्याच्या दरम्यान येतो. नवरात्र हा हिंदू धर्मातील स्त्रियांचा प्रमुख उत्सव म्हणून ओळखला जातो.
हा सण पूर्ण भारतात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने केला जातो. नवरात्र हा नऊ रात्रींचा उत्सव असतो, ज्यात सर्व स्त्रिया देवीच्या नऊ वेगवेगळया रुपांचे पूजन करीत असतात. नवरात्रीमध्ये देवी समोर अखंड दिवा लावला जातो. देवीची नऊ दिवस भक्तिभावाने पूजा केल्याने ती आनंदी होते आणि भक्तांचे सर्व त्रास दूर करते. यावेळी नवरात्री २६ सप्टेंबर २०२२ रोजी सुरु होत आहे.
नवरात्रीचे महत्व –
नवरात्र हा सण भारतामध्ये तसेच अनेक देशातही बनवला जातो. आपल्या हिंदु संस्कृतीत धर्माला महत्व आहे. प्रथा, परंपरा, सण अतिशय भक्तिभावाने आणि निष्ठेने आजही साजरे होतांना दिसतात. नवरात्र हा तर भारतातील अतिशय पवित्र आणि महत्वाचा उत्सव आहे, संपुर्ण नउ दिवस देवीची पुजा, अर्चा, आराधना करत मंगलमय अशा वातावरणात भक्तजन देवीची अनेक रूपं या नउ दिवसात पुजतात. हिंदु धर्मातील महत्वाचा उत्सव म्हणुन या सणाकडे बघितले जाते. तसेच हिंदू संस्कृतीतील नवरात्र हा उत्सव देवी दुर्गेला समर्पित असा उत्सव आहे. संस्कृत मध्ये नवरात्री या शब्दाचा अर्थ नऊ रात्री असा होतो. भारतात आणि नेपाळ मधे साजरा करण्यात येतो. एका वर्षात ५ प्रकारचे नवरात्र येतात त्यात शारदिय नवरात्र सर्वात प्रसिध्द आहे. याच ठिकाणी नवरात्राचा अर्थ शारदिय नवरात्र असाच असतो.
मडक्यामध्ये धान्य पेरले जाते. त्यावर अखंड दीप लावला जातो. रोज फुलांची माळ सकाळ-संध्याकाळ आरती ही केली जाते. घरोघरी किंवा सार्वजनिक मंडळात घटस्थापना होत असते. प्रत्येक घराची स्थापना करण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि प्रत्येक ठिकाणी देवीची वेगवेगळी रूपे व नावांनी ओळखल्या जाणाऱ्या देवीच्या मूर्तींची स्थापना केली जाते. देवीच्या घटस्थापनेच्या वेळी ब्राह्मणाला बोलावून त्याच्याकडून ही घटस्थापना करून घेतली जाते. नवमीच्या दिवशी होमहवन असते. दहाव्या दिवशी दसरा हा सण बनवण्यात येतो.
नवरात्री मधील दिवस आणि कोणत्या दिवशी कोणती माळ येते यावर दर नवरात्रीमध्ये नऊ दिवसांचे नऊ रंग ठरतात. यंदा पांढर्या रंगापासून सुरूवात होईल तर पिंक अर्थात गुलाबी रंगाने सांगता होणार आहे.
प्रतिपदा पहिला दिवस – 26 सप्टेंबर – पांढरा
द्वितीया दुसरा दिवस – 27 सप्टेंबर- लाल
तृतीया तिसरा दिवस – 28 सप्टेंबर – रॉयल ब्लू
चतुर्थी चौथा दिवस – 29 सप्टेंबर – पिवळा
पंचमी पाचवा दिवस – 30 सप्टेंबर – हिरवा
षष्ठी सहावा दिवस – 1 ऑक्टोबर – राखाडी
सप्तमी सातवा दिवस – 2 ऑक्टोबर – नारंगी
अष्टमी आठवा दिवस – 3 ऑक्टोबर – मोरपिसी
नवमी नववा दिवस – 4 ऑक्टोबर – गुलाबी
दरम्यान नवरात्रीचे नऊ रंग आणि शारदीय नवरात्रीच्या प्रथा, परंपरेचे कोणताच थेट संबंध नाही. हे रंग केवळ महिला त्यांच्यामधील एकजूट दर्शवण्यासाठी पाळतात. त्याचा देवीच्या सणावर कोणताही परिणाम अवलंबून नसतो.
नवरात्रीच्या महत्वाच्या तिथी
नवरात्रीचा पहिला दिवस: 26 सप्टेंबर 2022, सोमवार – प्रतिपदा (देवी शैलपुत्री)
नवरात्रीचा दुसरा दिवस: 27 सप्टेंबर 2022, मंगळवार – द्वितीया (देवी ब्रह्मचारिणी)
नवरात्रीचा तिसरा दिवस: 28 सप्टेंबर 2022, बुधवार – तृतीया (देवी चंद्रघंटा)
नवरात्रीचा चौथा दिवस: 29 सप्टेंबर 2022, गुरुवार – चतुर्थी (देवी कुष्मांडा)
नवरात्रीचा पाचवा दिवस: 30 सप्टेंबर 2022, शुक्रवार – पंचमी (देवी स्कंदमाता)
नवरात्रीचा सहावा दिवस: 01 ऑक्टोबर 2022, शनिवार – षष्ठी (देवी कात्यायनी)
नवरात्रीचा सातवा दिवस: 02 ऑक्टोबर 2022, रविवार – सप्तमी (देवी कालरात्री)
नवरात्रीचा आठवा दिवस: 03 ऑक्टोबर 2022, सोमवार – अष्टमी (देवी महागौरी)
नवरात्रीचा नववा दिवस: 04 ऑक्टोबर 2022, मंगळवार – नवमी (देवी सिद्धिदात्री)
दुर्गा विसर्जन दिवस: 05 ऑक्टोबर 2022, बुधवार – दशमी (देवी दुर्गा मूर्तीचे विसर्जन)
Discussion about this post