व्हीएसआरएस मराठी न्युज –महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी सेलने अंडरग्रॅज्युएट प्रोग्राम्ससाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.
यात बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग, बॅचलर ऑफ फार्मसी आणि अॅग्रीकल्चर शाखांचा समावेश आहे. बीई, बीफार्म आणि अॅग्रीकल्चर प्रोग्राम्ससाठीची एमएचटी सीईटी अर्जप्रक्रिया 8 मार्चपासून सुरू झाली आहे. एमएचटी सीईटी 2023 साठीची अर्ज प्रक्रिया 7 एप्रिलपर्यंत सुरू राहिल. अर्जदार mhtcet2023.mahacet.org या वेबसाइटवर अर्ज सबमिट करू शकतात.
ज्या विद्यार्थ्यांना बीई, बीफार्म किंवा अॅग्रीकल्चर शाखेत प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी या परीक्षेसाठी तत्काळ अर्ज दाखल करणं गरजेचं आहे. एमएचटी सीईटी 2023 च्या तारखांनुसार, नोंदणी प्रक्रिया 7 एप्रिलला संपणार असून, उमेदवार 8 ते 15 एप्रिल 2023 दरम्यान सर्व श्रेणींसाठी 500 रुपये अतिरिक्त विलंब शुल्कासह वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करू शकतील.
Discussion about this post