व्हीएसआरएस मराठी न्युज –माजी गृहराज्यमंत्री व विधान परिषद सदस्य सतेज बंटी पाटील यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी सभागृहात त्यांच्या निवडीची घोषणा केली.
पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला त्याबद्दल सर्व वरिष्ठांचे आभार व्यक्त करतो, असे सतेज पाटील म्हणाले.
Discussion about this post