व्हीएसआरएस मराठी न्युज -पुणे-सातारा रस्त्याची (जुना कात्रज घाट रस्ता) मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे सदर रस्त्यावर एकेरी वाहतूक करण्यात आली असून साताऱ्याकडून कात्रज चौकामार्गे पुणे शहरात येणाऱ्या वाहतूकीला बंदी करण्यात आली.
सदर रस्त्यावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असून सातारा ते पुणे ही वाहतूक जुन्या कात्रज घाटातून न करता त्यावरील वाहतूक नवीन बोगद्यातून दरीपूलामार्गे पुण्याकडे वळविण्यात आल्याची माहिती सदर आदेशान्वये देण्यात आली आहे .
याबबातचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी प्रशासनाला दिले आहेत. सदरचा आदेश ३ डिसेंबर २०२२ पासून ३१ डिसेंबर २०२२पर्यंत लागू राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
Discussion about this post