व्हीएसआरएस मराठी न्युज –यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी १०.७५० (अमेटी युनिर्व्हसिटी) व कि.मी २९.२०० (मडप बोगदा व खालापूर टोल प्लाझा दरम्यान) येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत उद्या दि.२१ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत करण्यात येणार आहे.
या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी तसेच जड-अवजड वाहने) वाहतूक पूर्णत: बंद राहील. वाहनाधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने (कार) शेडुंग फाटा कि.मी ८.२०० येथून वळवून एन.एच.४ जुना मुंबई-पुणे महामार्गावरुन शिंग्रोबा घाटातुन मॅजिक पॉईंट कि.मी ४२.००० येथून पुन्हा द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.
Discussion about this post