Breaking News : नागपूर : नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथे असलेल्या स्फोटके तयार करण्याच्या कारखान्यात स्फोट होऊन ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोझिव्ह या कंपनीत हा स्फोट झाला. कास्टबूस्टर प्लँटमध्ये पँकिंग करत असताना हा स्फोट झाला असल्याचे वृत्त आहे. या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. ए.एन.आय. या वृत्तसंस्थेने दिल्या या बातमीला नागपूर ग्रामीण पोलिसांनी दुजोरा दिला आहे.
पोलीस आणि बचावयंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या असून मदतकार्य सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
Discussion about this post