Pimpri News : पिंपरी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीमध्ये आज दि. ९ डिसेंबर रोजी कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविकांचा मेळा जमला आहे.
ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दर्शनाकरिता राज्यभरातून असंख्य भाविक आळंदीत गोळा झाले आहेत. देहू आळंदी मार्गावर अनेक भाविकांच्या दिंड्या कालपासून आळंदीकडे मार्गक्रमण करताना दिसत होत्या. आज सकाळी आळंदीतील दर्शन मंडप वारक-यांनी पूर्णपण भरून गेला. इंद्रायणी घाटावर वारक-यांनी स्नानासाठी गर्दी केली होती.टाळ मृदंगाच्या तालावर अनेक दिंड्या नगरप्रदक्षिणा करत असल्याचेही दिसत होते. सर्वत्र हरिनामाचा गजर सुरू होता.
Discussion about this post