व्हीएसआरएस मराठी न्युज -राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नोव्हेंबरमध्ये अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत.
पक्षातील आमदार आणि मंत्र्यांसह शिंदे अयोध्येत जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. याआधी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबरोबर अयोध्येचा दौरा केला होता. आता शिवसेनेतील बंडानंतर मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर शिंदे पहिल्यांदाच अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणार आहेत.
वर्षा या शासकीय निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी अयोध्या दौऱ्याविषयी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तिथे जाऊन शिंदे रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. यावेळी शिंदे शक्तिप्रदर्शन करतील, असा अंदाज आहे.
Discussion about this post