व्हीएसआरएस मराठी न्युज –ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खरगे यांनी बुधवार (दि. 26 ऑक्टोबर)रोजी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा कार्यभार हाती घेतला आहे. सुमारे अडीच दशकानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्ष विराजमान झाले आहेत.
या कार्यक्रमावेळी मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी, खर्गे यांचे अध्यक्ष पदाच्या निवडणुकितील प्रतिस्पर्धी आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित होते.
काँग्रेस अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर भाषण करताना हा क्षण भावूक असल्याची भावना मल्लिकार्जून खरगे यांनी व्यक्त केली. तसेच “एका सामान्य कुटुंबातील मुलाला काँग्रेस अध्यक्ष होण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे”, असेही ते म्हणाले. काँग्रेस नेते मधुसूदन मिस्त्री यांनी मल्लिकार्जून खरगे यांना निवडणूक प्रमाणपत्र दिले.
Discussion about this post