व्हीएसआरएस मराठी न्युज –पूर्ववैमनस्यातून तरुणाचा टोळक्याकडून कोयत्याने वार करत पवन लष्करे याचा खून करण्यात आला आहे. ही घटना मोशी येथे 25 ऑक्टोबर रोजी अकराच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, त्याचा मित्र पवन लष्करे व करण वंजारे हा मोशीतील शिवरस्ता येथील सीएनजी पंपाजवळ उभे होते. यावेळी सुरज व पवन याच्याशी झालेल्या जुन्या वादातून आरोपींनी फिर्यादी व सुरज याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच, पवन याच्यावर कोयत्याने व पालघन याने डोक्यात वार करत खून केला. तसेच फिर्यादी याच्यावर कोयत्याने वार करत तर वंजारेला सिमेंटच्या गट्टूने मारहाण करत जखमी केले.
पवन हा दोघांना मारण्यासाठी मंगळवारी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आला. तिथे , पवन आणि अक्षय , सोन्या यांच्यात वाद झाले. त्यांच्यासोबत आलेल्या आठ ते दहा जणांच्या टोळक्याने पवन लष्करे याच्यावर कोयत्याने सपासप वार करून खून केला. ही घटना मध्यरात्री घडली असून चार जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी सोन्या उर्फ परशुराम जाधव (वय 21 रा.चिंचवड), गणेश शिंदे (वय.22 रा. चऱ्होली), साहिल म्हस्के (वय 22 रा.चिंचवड) व राजू दोडमाने (वय 22 रा.पिंपरी) अशी अटक आरोपींची नावे असून अत्रय काळे (वय 23 रा.चाकण) 4 ते 5 अनोळखी इसम व एका अल्पवयीन मुलावर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
Discussion about this post