व्हीएसआरएस मराठी न्युज –राज्यात आजपासून (2 जानेवारी) वेगवेगळ्या जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे.
2 ते 4 जानेवारीपर्यंत चालक पदासाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी तर 5 जानेवारीला महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. 6 ते 14 जानेवारी 2023 पर्यंत पोलीस शिपाई पदासाठी पुरुष उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे. तर 15 ते 17 जानेवारीपर्यंत पोलीस शिपाई पदासाठी महिला उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे. रविवारचा दिवस वगळून ही चाचणी होणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान मैदानी चाचणीला येताना उमेदवारांनी कोणती कागदपत्रे सोबत आणणं आवश्यक आहे, याबाबत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ही कागदपत्रे सोबत आवश्यक
– उमेदवारांच्या ओळखपत्राच्या दोन प्रती
– आवेदन अर्जाच्या दोन छायांकित प्रती,
– सर्व मूळ कागदपत्रे
– सर्व कागदपत्रांचा छायांकित प्रतींचा संच
– अर्जावर सादर केलेला फोटो (सहा फोटो)
– आरक्षण, क्रीडा प्रमाणपत्र, चारित्र्य पडताळणी अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड, एलएमव्ही लायसन्स, प्रवेश पत्र
Discussion about this post