व्हीएसआरएस मराठी न्युज मुंबई -आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबईत दाखल एफआयआर प्रकरणी हायकोर्टानं दिलासा दिला आहे. याप्रकरणी 1 एप्रिलपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत.
मात्र रश्मी शुक्ला यांच्या या याचिकेला राज्य सरकारकडनं विरोध करण्यात आला. याचप्रकरणी पुण्यात दाखल पहिल्या केसमध्ये रश्मी शुक्ला सहकार्य करत नसल्याचा राज्य सरकारनं हायकोर्टात आरोप केला. याची दखल घेत हायकोर्टानं रश्मी शुक्ला यांना चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश देत येत्या 16 आणि 23 मार्च रोजी मुंबईत तपासअधिका-यांपुढे चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच रश्मी शुक्ला यांच्या गुन्हा रद्द करण्यासाठीच्या दोन्ही याचिकांवर 1 एप्रिलला एकत्रित सुनावणी घेण्याचे निर्देश न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आणि श्रीराम मोडक यांच्या खंडपीठानं शुक्रवारी जारी केलेत.
Discussion about this post