व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –
अजित पवार यांचे खंदे समर्थक संजोग वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
मुंबईतील ‘मातोश्री’ या ठाकरे यांच्या निवासस्थानी वाघेरे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन हाती बांधून घेतलं. हजारो समर्थांसह वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह इतरही नेते उपस्थित आहेत.
यावेळी वाघेरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला आपण पक्षात प्रवेश दिला. त्याबद्दल मी उद्धव साहेबांचे आभार मानतो. मी शब्द देतो की, येत्या काळात मी पक्षाच्या प्रसारासाठी मी प्रयत्न करत राहील. लोकांच्या सेवेसाठी कायम उपलब्ध असतो. हे काम पुढे घेऊन जाण्याचं काम मी करेन, असं वाघेरे म्हणाले.
Discussion about this post