पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | टपाल खात्यातील योजनांमध्ये ठेवीदारांकडून जमा करण्यात आलेल्या रक्कमेवरील २४ लाख रुपये कमिशनचा अपहार टपाल खात्यातील अधिकाऱ्यांनी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. प्रकरणी टपाल खात्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विमानतळ, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले. अपहार प्रकरणात सात जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
Discussion about this post