New Delhi : नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता त्यांचा सलग सहावा अर्थसंकल्प सादर करतील.
हा अर्थसंकल्प अंतरीम अर्थसंकल्प असणार आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्याने नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांसाठी केंद्रसरकारच्या आवश्यक खर्चांची पूर्ती करण्यासाठी आगाऊ अनुदानासाठी अर्थमंत्री संसदेची मंजुरी मागतील. एप्रिलमध्ये लोकसभा निवडणुका झाल्यानंतर जुलै महिन्यात समग्र अर्थसंकल्प संसदेसमोर सादर केला जाईल.
त्यामुळे या अर्थसंकल्पात फारमोठ्या घोषणा असण्याची शक्यता कमी आहे.तथापि निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे अर्थव्यवस्था आणि शेतकरी आणि महिला यांसारख्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटकांसाठी काही महत्त्वाचे असेल अशी अपेक्षा आहे.
Discussion about this post