Breaking News : त्रिवेंद्रम : त्रिवेंद्रम येथे ८ डिसेंबर रोजी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग झालेला रुग्ण सापडला आहे.JN1 असे या व्हेरिएंटचे नाव आहे. तो अधिक घातक असल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर WHO ने भारताला सावधगिरीचा इशारा दिला आहे. यामुळे सर्व राज्यातील आरोग्य यंत्रणांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आरोग्य मंत्रालयाने राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणांना मॉक ड्रिलचे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी तातडीची बैठक घेतली.मास्क, ऑक्सिजन सिलेंडर्स, औषधे यांच्या साठ्याचा आढावा घेण्यात आला असून या वस्तूंचा तुटवडा भासू नये म्हणून राज्याची सीमा बंद न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी सिंगापूरला गेलेल्या तामीळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील एका व्यक्तीला JN1 संसर्ग झाल्याचे दिसून आले होते. आता त्या परिसरात JN1 संसर्गित रुग्ण आढळले आहेत. मात्र, त्यामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसत नाही. तथापि कोरोनाचा धोका पुन्हा वाढल्याने नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, श्वसनाचा त्रास असल्यास डॉक्टरांना दाखवावे असे आरोग्य यंत्रणेने म्हटले आहे.
Discussion about this post