Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी एका आठ वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले होते. त्याच्या पालकांनी २५ फेब्रुवारी रोजी दुपारी या प्रकरणी वाकड पोलीसठाण्यात तक्रार नोंदविली असता पोलिसांनी दोन पथके तयार करून या मुलाचा शोध सुरू केला. त्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक तरुण या मुलाला घेऊन जात असताना दिसून आला. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्या तरुणाला शोधून ताब्यात घेतले. त्याला पोलिसीखाक्या दाखवताच त्याने या मुलाचे अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला व त्यानंतर त्याला ठार मारून त्याचा मृतदेह बावधन परिसरात टाकून दिल्याची कबुली दिली.
पवन जागेश्वरप्रसाद पांडे, वय २८ वर्षे, रा. गाव नागर, थाना माणिकपूर, जि. चित्रकूट, राज्य उत्तरप्रदेश असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.त्याच्यावर ३०२,३६४,३६५,३६७,३६८,३७७,२०१ सह पोक्सो कायदा कलम ४, ६, ८, १०, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील राधेशाम रायसिंग बरडे, वय ३३ वर्षे, रा. रोहित कलाटे चाळ, पिंकसिटी सोसायटी समोर, पिंकसिटी रोड, वाकड, पुणे यांनी त्यांचा आठ वर्षाचा मुलगा २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळपासून बेपत्ता असल्याची तक्रार वाकड पोलीसठाण्यात २५ फेब्रुवारी रोजी दुपारी वाकड पोलीसठाण्यात दिली.
पोलिसांनी याचे गांभीर्य ओळखून तात्काळ दोन पथके नेमून तपास सुरू केला. या पथकाला सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण बरडे यांच्या मुलाला घेऊन जात असताना दिसला. पोलिसांनी त्या तरुणाची ओळख पटवून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उप आयुक्त बापू बांगर, सहा.आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विठ्ठल साळुंखे, निरीक्षक (गुन्हे) रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक निलेश नलावडे, उपनिरीक्षक सचिन चव्हाण,अनिरुध्द् सावर्डे, बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, सहायक फौजदार राजेंद्र काळे, हवालदार संदीप गवारी, वंदु गिरे,स्वप्निल खेतले,विनायक म्हसकर,अतिश जाधव,प्रमोद कदम, अतिक शेख, विक्रांत चव्हाण,हनमंत कुंभार, नाईक प्रशांत गिलबीले, रामचंद्र तळपे, शिपाई भास्कर भारती, अजय फल्ले,विनायक घारगे, कौतेंय खराडे, लामतुरे, स्वप्निल लोखंडे, रमेश खेडकर, ज्ञानदेव झेंडे,सागर पंडीत यांनी केली.
Discussion about this post