Pimpri News : पिंपरी : चिखली, सानेचौक येथे राहणार्या आणि चैनीसाठी मोबाईल, मंगळसूत्रे चोरणाऱ्या तरुणाला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एअक मंगळसूत्र आणि तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
लोकेश दयानंद कांबळे (वय १८, रा. मोरेवस्ती, साने चौक, चिखली) असे या आरोपीचे नाव आहे. पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल संतोष निकाळजे (वय २२, बोडकेवाडी, जि. मुळशी) ही २४ जानेवारी रोजी दुपारी पांडवनगर हिंजवडी येथून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञातांनी तिचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून नेले.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान 35 सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीची ओळख पटली. सहायक पोलिस निरीक्षक राम गोमारे यांना मिळालेल्या माहितीनुसार, लोकेश कांबळे याला हिंजवडी पोलिसांनी भूमकर चौकातून अटक केली. हा गुन्हा त्याने आपल्या दोन साथीदारांसह केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून एक मंगळसूत्र आणि तीन मोबाईल असा एकूण ६९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईतून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ, तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस हवालदार बंडू बारणे, बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापूसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कैलास केंगले, कुणाल शिंदे, विक्रम कुदळ, अरुण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे,सराटे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडित यांनी ही कारवाई केली.
Discussion about this post