व्हीएसआरएस मराठी न्युज –पीएमपीला गाड्या पुरवणाऱ्या ठेकेदारांना थकीत देयकापोटीची ६६ कोटींची रक्कम पीएमपी प्रशासनाने उपलब्ध करून दिल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा ठेकेदारांनी संप मागे घेतला.
त्यामुळे मंगळवारपासून पीएमपीची पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सेवा पूर्ववत होण्यास सुरूवात झाली. संप मिटल्याने पीएमपीच्या प्रवासी आणि विदयार्थ्यांना दिलास मिळाला आहे.
संपामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात केवळ ९२३ गाड्या संचलनात असल्याने या दोन्ही शहरातील प्रवाशांना त्याचा मोठा फटका बसला होत. प्रवाशांना अन्य वाहतूक पर्यायांचा वापर करावा लागला. प्रवासी संख्या पहाता पीएमपीच्या ताफ्यात अपु-या गाड्या आहेत. मे. ट्रॅव्हल टाईम मोबिलिटी इंडिया प्रा.लि., मे. अॅन्टोनी गॅरेजेस प्रा.लि., मे.हन्सा वहन इंडीया लि., मे. ओलेक्ट्रा ग्रीनटेक लि., मे. ईव्ही ट्रान्स प्रा. लि. आणि मे. ओहा कम्युट प्रा. लि.या ठेकेदारांनी संप पुकारला होता.
Discussion about this post