व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी (दि. ३ जानेवारी २०२२) :- सलग तीन वेळा चिंचवड विधानसभेचे नेतृत्व केलेले पिंपरी चिंचवड शहर भाजपचे माजी अध्यक्ष लोकप्रिय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे.
आज मंगळवारी (दि. ३) रोजी उपचारादरम्यान सकाळी रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे,अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.
दु. 3 ते 6 या वेळी पार्थिव अंत्य दर्शनासाठी त्यांच्या घरी असेल.
संध्या 7 वाजता अंत्यविधी पिंपरी गुरव येथे होईल.
लक्ष्मण जगताप त्यांच्या राजकीय कारकिर्दीत 4 वेळा नगरसेवक आणि 4 वेळा आमदार झाले. ते 1986 मध्ये पहिल्यांदा नगरसेवक झाले. नंतर स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. त्यांना 2000 मध्ये महापौर होण्याची संधी मिळाली. लक्ष्मण जगताप यांनी 2009 मध्ये चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहून आताचे खासदार श्रीरंग बारणे यांचा पराभव केला आणि विजय मिळवला होता. ते 2019 मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाले. भाजपकडून निवडणूक लढवत त्यांनी विक्रमी मताधिक्य मिळवले आणि सलग चौथ्यांदा आमदारकीची निवडणूक पण जिंकली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या ताब्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्व सूत्रे केवळ आमदार जगताप यांच्यामुळे 2017 मध्ये भाजपकडे आली.
विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले होते. त्यापाठोपाठ मंगळवारी आमदार लक्ष्मण जगताप यांनीही अखेरचा श्वास घेतला.
Discussion about this post