व्हीएसआरएस मराठी न्युज -शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीला भीषण अपघात ( Car Accident) झाला आहे.
या अपघातात विनायक मेटेंसह त्यांचा सुरक्षारक्षकही गंभीर जखमी झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवर हा अपघात झाला असून पहाटे 5:30 वाजता भातान बोगद्याजवळ ही घटना घडली.
पुणे ते मुंबई प्रवास करताना मेटे यांचे वाहन अनोळखी वाहनावरती आदळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच अपघात झाला तेव्हा विनायक मेटे यांचा मुलगा गाडी चालवत असल्याचंही सांगितलं जातंय. या अपघातात मेटे यांचा मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. मात्र मेटे आणि त्यांच्या सुरक्षारक्षक या अपघातात गंभीर जखमी झाले असून अपघातातील जखमींवर पनवेलच्या एम. जी. एम. रुग्णालयात उपचार सुरू होत.
अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.
कोण होते विनायक मेटे
विनायक मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते.
मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते.
मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलनं केली.
अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष देखील होते.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी
सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार
त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य
Discussion about this post