पिंपरी | (व्हीएसआरएस न्यूज) | पिंपरी महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांचा विद्यार्थ्यांना शिकविण्याऐवजी इतर प्रशासकीय कामकाज, शासनाला विविध माहिती पाठविणे, ही माहिती टाइप करून देणे, अशा विविध कामांसाठी जास्त वेळ जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांसाठी १०५ डाटा एन्ट्री ऑपरेटर कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या एकूण १०५ प्राथमिक, तर १८ माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये ४२ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थीसंख्या मोठी असताना महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे दोन महिन्यापूर्वी पालिकेने सुमारे अडीचशे कंत्राटी शिक्षकांची भरती केली.
Discussion about this post