व्हीएसआरएस मराठी न्युज –ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत राज्यातील निवडणुका पुढे ढकलण्याचा कायदा विधीमंडळाने मंजूर केला. विशेष म्हणजे राज्यपालांनीही या कायद्यावर सही केल्याने कायदा लागू करण्यात आला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करा असे थेट आदेशच सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
आणि याच आदेशाचे पालन करून महापालिका आपले निवडणुकांचे काम पार पाडत आहे. अश्यातच ज्या नागरिकांचे मतदार यादीत नाव नाही, त्यानं देखील नाव नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे.
दुबार किंवा मृत मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. त्यानुसार मतदारयादी नाव (Voter List) नोंदविण्यासाठी पुणेकरांना शेवटचे १२ दिवस संधी असणार आहे. पुणे जिल्ह्याची प्रारूप मतदारयादी ९ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मतदारयादी अद्ययावत करण्याच्या मोहिमेंतर्गत २४ ऑक्टोबरपर्यंत मतदान केंद्राचे सूसुत्रीकरण, प्रमाणिकरण करणे, दुबार, समान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तांत्रिक त्रुटी दूर करणे, मतदारांचे छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा,
विभाग किंवा भाग यांची गरजेनुसार नव्याने मांडणी करुन मतदान केंद्राच्या सीमांच्या पूनर्रचना करून मतदान केंद्राच्या यादीला मान्यता आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबद्ध योजना आखण्यात येणार आहे.
२५ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत पुरवणी आणि एकत्रित प्रारुप यादी तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्याची प्रारुप मतदार यादी ९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली.
तर, आयोगाने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीतून २०१७ च्या तुलनेत २०२२ च्या निवडणूकीसाठीतब्बल ८ लाख २३ हजार ९१६ मतदार पुणे महापालिका निवडणुकीसाठी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
मतदार यादीत नाव आहे किंवा कसे, हे http://www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा voters helpline या मोबाइल उपयोजनवर (ॲप) संपूर्ण नाव, वय, लिंग, राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदार संघ ही माहिती भरल्यानंतर समजेल.
मतदार यादी नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज क्रमांक सहा भरावा, पत्ता बदलण्यासाठी आठ-अ, तर नाव वगळणीसाठी सात क्रमांकाचा अर्ज भरावा, असे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.
Discussion about this post