National : जयपूर : राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून भाजपच्या भजनलाल शर्मा यांनी आज १५ डिसेंबर रोजी शपथ घेतली. त्यांचा आज वाढदिवसही आहे. जयपूरमधील ऐतिहासिक अल्बर्ट हॉलमध्ये हा शपथविधी झाला. सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित होते.
शर्मा यांच्यासह विद्याधरनगरच्या आमदार दियाकुमारी आणि दुडूचे आमदार प्रेमचंद बैरवा यांनी राजस्थानचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल कलराज मिश्रा यांनी त्यांना शपथ दिली.
प्रेमचंद बैरवा यांनी शपथविधी सोहळ्यापूर्वी आज जयपूरमधील मोती डुंगरी गणेश मंदिरात प्रार्थना केली.
शर्मा मोठ्या मताधिक्याने सांगानेर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.त्यांनी चार वेळा भाजपचे प्रदेश सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे.
या विधानसभा निवडणुकीत भाजपला 115 जागा मिळाल्या, तर काँग्रेसला 69 जागा मिळाल्या. विधानसभेच्या 200 जागांपैकी 199 जागांवर मतदान झाले.
Discussion about this post