New Delhi : नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांचे नाव एका मनीलाँड्रींग प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये दाखल केले आहे. मात्र, त्यांना आरोपी करण्यात आलेले नाही. आरोपींशी संबंध असल्याने त्यांचे नाव चार्जशीटमध्ये दाखल करण्यात आले आहे. तथापि, यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
हे प्रकरण फरिदाबाद नजिकच्या अमीरपूर येथील एका भूखंडाचे आहे. हा भूखंड ज्याच्याकडून विकत घेतला त्यालाच पुन्हा विकण्यात आला. या प्रकरणात मनीलाँड्रींग झाल्याचा संशय ईडीला आहे.
प्रियांका आणि रॉबर्ट वाड्रा यांनी २००६ मध्ये अमीरपूर गावात ५ एकर शेतजमीन रिअल इस्टेट एजंट एच.एल. पाहवा यांच्याकडून विकत घेतली. २०१० साली हीच जमीन पुन्हा पाहवा यांना विकली. हे सर्व मनीलाँड्रींगसाठी केल्याचा ईडीला संशय आहे. या प्रकरणात देशाबाहेर पळून जाऊन ब्रिटनमध्ये स्थायिक झालेला शस्त्रव्यापारी संजय भंडारीचा सहकारी सीसी थंपी याचाही संबंध आहे. त्याने पाहवाकडून २००५ ते २००८ या काळात अनेकवेळा जमीन खरेदी केली. ईडीचे असे म्हणणे आहे की, थंपी आणि प्रियांका यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचे घनिष्ठ संबंध आहेत.
Discussion about this post