व्हीएसआरएस मराठी न्युज –
श्रावण महिना जसजसा जवळ येत चालला आहे तसतसा भाविकांचा उत्साह वाढत चालला आहे. 4 जुलैपासून सुरु होणारा हा महिना 31 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. अर्थात अधिक मास असल्या कारणाने जवळपास दोन महिने श्रावण असणार आहे.
उत्तर भारतात देखील श्रावण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या ठिकाणी भगवान शंकराला लोक विशेष मानतात. या ठिकाणी भगवान शिवाची पूजा करून आशीर्वाद मिळवून साजरा केला जातो.
महाराष्ट्रात जरी श्रावण 18 जुलै पासून सुरु होत असला तरी उत्तर भारतात 4 जुलै पासून श्रावण महिना सुरु होतोय. श्रावण महिना हा भक्तीचा आणि उत्साहाचा सण म्हणून ओळखला जातो.
Discussion about this post