व्हीएसआरएस मराठी न्युज –राम मंदिराच्या अभिषेकची तारीख निश्चित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी रोजी अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहेत.
आता या कार्यक्रमाची निमंत्रणेही पाठवली जात आहेत. अयोध्या येथील राम मंदिरात 70 हून अधिक व्हीव्हीआयपी पाहुण्यांना आमंत्रित केले जाणार आहे. त्याची यादीही तयार करण्यात आली आहे. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीनंतर होणारी गर्दी पाहता राम मंदिर बांधकाम ट्रस्ट आपली तयारी वाढवण्यात व्यस्त आहे, अशा परिस्थितीत गरजा, सुविधा, सुरक्षा आणि सुरळीत व्यवस्था याबाबत बैठका घेऊन निर्णय घेतले जात आहेत.
गाझियाबादच्या दुधेश्वर वेद विद्यापीठाचा विद्यार्थी मोहित पांडे हे अयोध्येतील राम मंदिराचे पुजारी असतील. राम मंदिराचे पुजारी म्हणून मोहित पांडे यांची निवड करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहितने सात वर्षे शिक्षण घेतले आणि तिरुपती येथील तिरुमला तिरुपती देवस्थानमशी संलग्न असलेल्या श्री व्यंकटेश्वर वैदिक विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. यानंतर 2023 मध्ये मोहित पांडेने सामवेदाचा अभ्यास करून पदव्युत्तर पदवी मिळवली.
Discussion about this post