व्हीएसआरएस मराठी न्युज –
आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीचे नवरात्र सुरू होते. आपली पुरूषप्रधान संस्कृती असूनही, शक्तीचे दैवत देवी आहे. ‘देवी’ शब्दाचा अर्थच शक्ती असा आहे. ती स्वयंभू, संज्ञागर्भ असल्यामुळे, तिला ‘आदिशक्ती’ म्हणतात.
नवरात्रात दुर्गेची नऊ रुपांचा जागर केला जातो. ही रुपं म्हणजे, (१) शैलपुत्री (२) ब्रह्मचारिणी (३) चंद्रघंटा (४) कुषमांडा (५) स्कंदमाता (६) कात्यायनी (७) कालरात्री (८) महागौरी (९) सिद्धिदात्री.
माता शैलपुत्री देवीचा मंत्र –
वन्दे वाञ्छितलाभाय चन्द्रार्ध-कृत-शेखराम्। वृषारूढां शूलधरां शैलपुत्रीं यशस्विनीम् ॥
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीच्या शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते. पर्वतराज हिमालयाची कन्या असल्याने तिला शैलपुत्री असे म्हणतात.
पौराणिक मान्यतेनुसार, शैलपुत्रीचे पूर्वीच्या जन्मातील नाव सती होते आणि ती भगवान शंकराची पत्नी होती. सतीचे वडील दक्ष प्रजापती यांनी भगवान शंकराचा अपमान केला होता आणि त्यानंतर सतीने स्वत:ला यज्ञात जाळून घेतले. पुढच्या जन्मी याच सतीने शैलपुत्रीच्या रूपात प्रकट होऊन भगवान शंकराशी पुन्हा विवाह केला.
देवी शैलपुत्रीचा स्वभाव अतिशय शांत आणि साधा आहे. आईच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. आई तिच्या नंदी नावाच्या बैलावर स्वार होऊन संपूर्ण हिमालयावर बसलेली असते, म्हणून देवी शैलपुत्रीला वृषोरदा आणि उमा असेही म्हणतात. हे वृषभ वाहन शिवाचे रूप आहे आणि शैलपुत्री ही सर्व वन्य प्राण्यांची रक्षक आहे.
Discussion about this post