Pune News : पुणे : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची उद्या दि. ९ डिसेंबर रोजी पुण्यात जाहीर सभा होणार आहे. नाना पेठेतील महात्मा फुले मैदानावर सायंकाळी ५ वाजता ही सभा होणार आहे.
सध्या राज्य विधीमंडळाचे अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊत काय बोलणार? कोणावर टीका करणार? याची नागरिकांमध्ये उत्सुकता असून या सभेला किमान ५ हजार श्रोते उपस्थित राहतील असा अंदाज शिवसेना (उबाठा) गटाचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.
लोकसभा निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता संजय राऊत यांची ही सभा महत्त्वाची मानली जात आहे.
Discussion about this post