Pune News : पुणे : येरवड्यातील ऑनलाइन पेमेंट कंपनीला साडेतीन कोटी रुपयांचा गंडा घालणा-या पश्चिम बंगालमधील दोन सायबर चाच्यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
उबेद ऊर्फ उब्बेदुल्ला अन्सारी आणि अयूब बशीर आलम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
येरवड्यातील इझी-पे या नागरिकांना ऑनलाइन पेमेंटची सुविधा देणाऱ्या येरवडा येथील कंपनीच्या ६५ नोंदणीकृत एजंटांशी संगनमत करून कंपनीच्या अॅपद्वारे आरोपींनी कंपनीची साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी पुणे सायबर पोलिसठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी या आधीच दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडे तपास केला असता मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी अन्य आरोपींना अटक करण्यासाठी दिली गाठली. तथापि, त्या आधीच आरोपी पश्चिम बंगाल येथे पसार झाले होते. त्यांचा मोठ्या शिताफीने माग काढत पोलिसांनी कोलकाता येथे जात त्यांना बेड्या ठोकल्या. न्यायालयासमोर आरोपींना हजर केली असता त्यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीसकोठडी दिली आहे.
Discussion about this post