व्हीएसआरएस न्युज कुदळवाडी येथील दुर्गा माता मंदिरासमोरील ड्रेनेजलाइनही तुंबली असल्याने मैलामिश्रित पाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांच्या उत्पत्तीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
परिसरात सामान्य नागरिक व चाकरमान्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यांचे आरोग्य धोक्यात आले असून आजारपण आणि त्यामागे होणार खर्च न परवडणारा आहे. महापालिका प्रशासन मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. तरी प्रशासनच्या वतीने याठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी करावी. परिसरातील नादुरुस्त ड्रेनेजची तात्काळ दुसृष्टी करावी व हे ड्रेनेज भविष्यात पुन्हा तुंबणार नाही अशी उपाययोजना करावी, डास व कीटकांचा फैलाव रोखण्यासाठी औषध व धूरफवारणी करावी. स्वच्छतेबाबत तसेच साथीच्या आजारांबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी आहे.
यामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. पालिका प्रशासनाचे मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष होत असून यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशी मागणी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.
Discussion about this post