व्हीएसआरएस न्युज पिंपरी- महापालिकेच्या नेहरूनगर, पिंपरी येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमवरील जम्बो कोविड सेंटर येथे 25 मे 2021 रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास ही घटना घडली.
प्रीती जोसेफ व्हिक्टर (वय 50, रा. कोंढवा, पुणे) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 5) फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पिंपरीतील नेहरूनगर येथील जम्बो कोविड सेंटरच्या व्यवस्थापक आहेत. अज्ञात चोरट्याने सेंटरमधील 33 हजार 101 रुपये किमतीचा सीपीयू, सात हजार 457 रुपयांचा एक मॉनिटर, एक हजार 186 रुपये किमतीचा किबोर्ड असा एकूण 47 हजार 845 रुपये किमतीचा माल चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत. दरम्यान या कोविड सेंटरला बॉऊन्सरचा खडा पहारा असताना एवढा मोठा संगणक चोरट्यांनी चोरून कसा नेला, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.