व्हीएसआरएस न्युज पिंपरी -पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. ट्रान्सजेंडर समूहाने स्वयंप्रेरणेने या लसीकरण मोहीमेत सहभाग घेतला. महापालिकेने दिलेल्या आदराच्या वागणुकीमुळे समाधान देखील त्यांनी व्यक्त केले.
आम्ही पण समाजाचा घटक आहोत, आम्हाला पण समाजात चांगले जगण्याचा हक्क आहे. कोविड लसीकरणासाठी पुढाकार घेवून महानगरपालिकेने आम्हाला आमचा हक्क दिला याबद्दल आम्ही अतिशय आनंदीत आहोत, अशी भावना तृतीयपंथी दलजीतसिंग यांनी व्यक्त केली. कोविड लसीकरणाचे महत्व महापालिकेच्या वैद्यकीय अधिका-यांनी समजावून सांगितल्याने आम्ही लसीकरण करुन घेतले असून कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी इतरांनीही लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन देखील त्यांनी केले.
ट्रान्सजेंडर समूहाने स्वयंप्रेरणेने या लसीकरण मोहीमेत सहभाग घेतला. महापालिकेने दिलेल्या आदराच्या वागणुकीमुळे समाधान देखील त्यांनी व्यक्त केले. अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगिता तिरुमणी, डॉ. करुणा साबळे यांच्या उपस्थितीत ही लसीकरण मोहीम पार पडली.
महापालिकेने आम्हाला चांगली वागणूक देऊन आमच्या उत्तम आरोग्याचा विचार करुन कोविड लसीकरण मोहिम राबविली याबद्दल ट्रान्सजेंडर प्रतिनिधी किरण हुबळीकर, पुजा आंभोरे, पंकज बोकील, विश्वनाथ जैस्वाल आदींनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले.
Discussion about this post