व्हीएसआरएस न्युज कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे.
राज्यात आज 2844 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 029 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 65 हजार 277 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.26 टक्के आहे.
राज्यात आज 60 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 9, 263 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (04), नंदूरबार (4), धुळे (2), जालना (45), परभणी (58), हिंगोली (20), नांदेड (9), अकोला (29), वाशिम (09), बुलढाणा (18), यवतमाळ (06), वर्धा (6), भंडारा (2), गोंदिया (5), चंद्रपूर (92), गडचिरोली (19 ) या जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
राज्यात सध्या 37 हजार 794 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 2,54,985 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1,514 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 84, 29, 804 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65,44, 606 (11.2 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 394 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 477 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,18,813 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात सहा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4611 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1200 दिवसांवर गेला आहे.
पुणे शहरात (मंगळवारी) नव्याने 158 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 172 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची नोंद करण्यात आली आहे.
शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 500652 इतकी तर एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 90 हजार 231 झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 109 नवीन कोरोना बाधित रुग्णांची (मंगळवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 100 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा 19 लाखाचा टप्पा पूर्ण झाला. आजपर्यंत 19 लाख 14 हजार 114 जणांनी लस घेतली.
Discussion about this post